11.2.11

ll कसं हे प्रेम ll

ते अनोळखी प्रेम

जादूच्या छडीसारखा

तो नाजूक स्पर्श

हरवूनही हवा असणारा

ते निरागस डोळे

आपलच प्रेम जपणारं

तो दुरावलेला रस्ता

वधालातही जोडून ठेवणारा

ते एकत्र चालणं

शब्द नसूनही बोलणारे

तो सुसाट वारा

प्रेमाचा निरोप वाचणारा

निरोप....

" प्रेम हे प्रेमाच्या भावने पेक्षाही खोल असतं

समोर असूनही अदृश्य असतं

आणि...

अदृश्य नसूनही दिसत नसतं

 

शब्द हळूच भावनेच्या मांडीवर बसू लागतात

शब्द जागे असतात तेव्हा प्रेम झोपतं

आणि...

प्रेम जागं असतं तेव्हा शब्द झोपू लागतात "



-- Tanvi D

No comments: